Thursday, 3 November 2016

गुरुवर्य वैकुंठवासी कोंडाजीबाबा डेरे


गुरुवर्य वैकुंठवासी कोंडाजीबाबा डेरे  ह्यांचा जन्म बुचकेवाडी येथे सन १९०३ च्या आसपास झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तुकाराम डेरे आणि आईचे नाव सगुणाबाई डेरे होते. 

त्यांचं शिक्षण त्या काळी इयत्ता ३ री पर्यंत झाले होते. शिक्षणात बाबांना फारसा रस नसल्यामुळे पारंपारिक पद्धतीने गुरे सांभाळण्याचा कार्यभार त्यांच्याकडे आला. 

बाबा गवारवाडीचे गुराखी गवारी हयांच्याबरोबर गुरे वळण्यासाठी गोळ्या डोंगरावर जात असत. हा-हा म्हणता बाबा लग्नाच्या वयाचे झाले आणि घरात त्यांच्या लग्नाबद्दल विषय सुरु झाला. आई सगुणाबाई आणि वडीलांनी त्यावेळी तांबे गावाचे मिंढे ह्यांची सुकन्या जाईबाई ह्यांच्याशी बाबांचा विवाह झाला. 

बाबांना सहा अपत्ये झाली पैकी तीन मुले आणि तीन मुली होत्या. मुले अनुक्रमे एकनाथ, नारायण, आणि विठ्ठल होत. तर मुली अनुक्रमे यमुनाबाई, सरूबाई आणि नर्मदाबाई होत. 

त्या काळात जमिनी बागायत नसल्यामुळे रबी आणि सुगी ह्या दोनच हंगामात पिके घेतली जायची. आणि प्रमुख पिकांमध्ये गहू, बाजरी, भुईमूग, हरभरा हि पिके घेतली जायची. 

मुळात बाबांना जमीन कमी आणि अनिश्चित स्वरूपाचं शेतीतून मिळणारं उत्पन्न ह्यातून कुटुंबाचा  मेळ बसविणे अवघड होत असे. शेतीतून उत्पन्न तितक्याशा प्रमाणात मिळत नसल्याने बाबांनी सुरुवातील लाकडाच्या वखारीचा व्यवसाय सुरु केला, त्यातही बाबांना अपेक्षित यश न मिळाल्यावर बाबांनी गावी गिरणी, किराणा मालाचे दुकान थाटले.